दोरीवरील उड्या मारा, तंदुरुस्त राहा

कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्टे अॅट होमममुळे सर्व जन घरी आहोत. घरी असताना दोरीवरील उड्या मारणे (जम्प रोप) करणे हा अतिशय चांगला व्यायाम आहे. खेळाडूदेखील याचा वापर स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि एकाग्रता वाढवण्यासाठी करतात. त्यामुळे रोप करूया आणि कोरोनासारख्या कोविड १९ या विषाणूपासून वाचवू या. हे नियम पाळावेत हळूहळू दोरीच्या उड्या मारण्याची संख्या आणि वेळ दोन्ही वाढवावी. नॉयलॉन दोरी चांगली, वॉर्मअप केल्याशिवाय उड्या मारल्यात तर शरीर दुखू शकते. आधी हळूहळू उड्या मारा, दुसऱ्या मिनिटानंतर तुम्ही जोराने उड्या मारू शकता. दोरीच्या उड्या मारल्यानंतर पाच मिनिटे आराम करा किंवा शवासनात पडून राहा. अर्या तासानंतर हलका आहार घ्या. कडधान्य, सफरचंद, केळी, दूध किंवा लिंबू पाणी यांचा समावेश असावा, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा आजार असलेल्यांनी हा व्यायाम करू नये. दोरीवरील उड्याचे महत्त्व १५ मिनिटे सलग दोरीच्या उड्या मारणे मिनिटे पळण्याइतके परिणामकारक आहे. यामुळे एका मिनिटात तुम्ही १० ते २६ कॅलरीज बर्न शकता, वजन कमी करण्यास मदत होते. हाडे मजबूत होतात. लय, रणनीती आणि संचालन या तिन्ही गोष्टींचा ताळेमळ योग्य बसतोरोज अर्धा तास उड्या मारल्याने ५०० ग्रॅम वजन कमी होऊ शकते. हळूहळू उड्या मारण्याची आणि बेळ दोन्ही बाढवावी, ज्यामुळे पायांचे बळकट होतील. श्वासोच्छवास घेण्याची क्रिया जलद होते, फुफ्फुस तंदुरुस्त होते, शारीरिक संतुलन वाढतेपूर्ण शरीराचा म्हणजेच खांदे, हात, पाय, पोटस्नायू, हृदय अशा सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो. उंची वाढवायची, शरीराला वळणदार बनवायचेय, वजन कमी करायचे असेल तर हा चांगला व्यायाम. पोट आत-बाहेर होत असल्यामुळे पोटावरची साचलेली चरबी कमी होते, पायाचे सांये बळकट होतात.