सोलापूर : जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभरात थरकाप उडविलेला असतानाही सोलापूरकरांना याचे गांभीर्य बारत नसल्यामुळेच संचारबंदीचे आदेश मोडून लोक अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर मोठया संख्येने येताना दिसत आहेत. झोपडपट्टयांमधील नागरिक मोठया संख्येने घराबाहेर दिसत असून रस्त्यावरील रहदारीही वाढली आहे. लोकांची ही बेफिकिरी कोरोगाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्यास निष्पापांचे विनाकारण बळी जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या महाभयानक महामारीचे संकट परतवुन लावण्यासाठी २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउनची घोषणा केली या काळात लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले. लोक घराबाहेर पडलेच नाही तर या विषाणूचा संसर्ग थांबेलदेशासाठी व स्वतःसाठी घरातच राहा, अशी कळकळीचे साद घातली होती. जनता कला शंभर टक्के प्रतिसाद देणारे सोलापूरकर नंतरच्या संचारबंदीच्या काळातही सकाळी आणि सायंकाळच्या वेळी मोठया संख्येने सत्यावर येताना दिसत आहेत. झोपडपट्ट्यांमधील लोक दिवसरात्र रस्त्यावरच दिसत असून मुख्य रस्त्यावरही दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. किराणा, औषधे, दूध, भाजीपाला व अन्य अत्यावश्यक कामासाशी घराबाहेर पडण्यास हरकत नाही; परंतु विनाकारण घराबाहेर येऊन विषाणूचा संसर्ग वाढण्यास काही लोक कारणीभूत वरण्याची शक्यता आहे.
कोरोना विषाणूबाबत सोलापूरकरांना गांभीर्य वाटेना