नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शळी दाखवणे गरजेचे आहे, त्यासाठी मला आपल्या सर्वाची ९ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाची आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणजत्ती किया मोबाइलची फ्लैशलाइट लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहल जनतेला केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात लोकांना हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, रविवारी ५ एप्रिलला आपल्याला करोगाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून यायची आहे. यासाठी ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशदीचे जागरण करायचे आहे. ५ एप्रिलला राजी ९ वाजता मला आपले फळ ९ मिनिटे हवी आहेत. या वेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलपी फ्लैशलाइट लावा. हे ९ मिनिटे करा. देशभर सर्व लोक जेव्हा एक एक दिवे उजळतील तेव्हा प्रकाशाच्या महाशक्तीची जाणीव या मुळे आम्ही एकाच उद्देशाने एक होऊन लढत आहोत अशी भावना मनात जागृत होईल, असे सांगताना हे दिवे जाळताना आम्ही एकटे नाही आहोत याचा संकल्प करू या असे मोदी म्हणाले, वेळोवेळी देशातील जनतेच्या सामूहिक शक्तीची भव्यता, दिव्यता आणि त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. देश कोरोनाविरुद्ध इतकी मोठी विराट रूप, त्यांची अपार शकी वाचा सतत साक्षात्कार करत राहिले पाहिजे, असेही मोदी पुढे म्हणाले. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता या ९ मिनिटांच्या काळात कोणालाही बाहेर जायचे नाही, कोणालाही एकत्र जमायचे नाही हे मोदी यांनी आवर्जून सांगितले. २२ मार्च या दिवशी जनता कपyचे आवाहन केल्यानंतर लोक संध्याकाळी ५ वाजता थाळी, घंटा इत्यादी वाजवण्यासाठी घरांच्या बाहेर आले होते. कोठे कोठे तर लोकांनी घराबाहेर पडून गदीही केल्याचे दिसले. याच कारणामुळे पंतप्रधान मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता कुणीही घरातून बाहेर पडायचे नाही असे आवर्जून सांगितले आहे.
रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरात दिवे उजाळा नवी दिल्ली